राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा भारतीय राजकीय वर्तुळात अल्पावधीत अतिशय महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. भारतीय राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १० जून १९९९ रोजी १३ व्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना करण्यात आली. नेत्यांच्या कार्यक्षमतेमुळे कमी वेळात पक्षाने जनमत संपादन केले. पक्षाची चमकदार कामगिरी आणि जनमताचा कौल पाहून भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला.

पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना पक्षाला सामोरे जावे लागले. देशात आणि राज्यांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पक्षाने आपले उमेदवार उभे केले. जनतेचा भक्कम आशीर्वाद मिळाला आणि राष्ट्रीय व राज्यपातळीवर एक समर्थ पक्ष म्हणून मान्यता मिळाली. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्येही ‘राष्ट्रवादी’ राज्यांच्या सत्तेत सहभागी झाली. गोवा, नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम, गुजरात, केरळ, बिहार, ओरिसा, झारखंड, अरुणाचल या राज्यांमध्ये पक्षाला जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. १५ वर्षांच्या प्रवासात निष्ठावान कार्यकर्ते आणि कर्तबगार नेत्यांच्या जोरावर केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागांतल्या नागरिकांशीही नाते जोडले आहे. विविध राज्यांपासून केंद्रशासित प्रदेशांपर्यंत देशाच्या सर्वच भागांत पक्षाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. अत्यंत अल्पावधीत निवडणूक आयोगाची राष्ट्रीय मान्यता मिळवून देशभर विस्तारलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा देशातील पहिला व एकमेव पक्ष आहे.

Mr.Sharad Pawar

Post : President of the Nationalist Congress Party.

Area :Baramati, Pune

M: 8087742000 Call now

Birthday: 12 December 1940

Sharad Govindrao Pawar

[1] is an Indian politician who serves as the president of the Nationalist Congress Party which he founded in 1999, after separating from the Indian National Congress. He previously served as the Chief Minister of Maharashtra on three separate occasions and held the posts of Minister of Defence and Minister of Agriculture in the Government of India. Pawar hails from the town of Baramati in the Pune district of Maharashtra. He is a member of the Rajya Sabha where he leads the NCP delegation. He holds a position of prominence in national politics as well as the regional politics of Maharashtra.

[2] On 17 June 2015, he was re-elected as president of the Mumbai Cricket Association, a position he held from 2001 to 2010 and in 2012.

[3] On 17 December 2016, he stepped down as the President of Mumbai Cricket Association.

[4] In 2017, he was awarded the Padma Vibhushan, India's second highest civilian honour.

[5] Pawar has served as the Chairman of the Board of Control for Cricket in India from 2005 to 2008 and as the president of the International Cricket Council from 2010 to 2012.

भाषिक अल्पसंख्यांकांचा जनाधार राष्ट्रवादीकडे आणण्याचा निर्धार...

19 Feb 2019

राष्ट्रवादीच्या अर्बन सेलची कोल्हापूर शहरात बैठक

25 Feb 2019

दरवर्षी दगावतात २,३९,००० बेटीयां...

24 Jan 2019